बेन स्टोक्सनं फेसबुकच्या माध्यमातून केलं न्यूझीलंड ‘हे’ आवाहन।

रायगड माझा वृत्त 

ICC Cricket World Cup स्पर्धेत अंतिम सामन्यात बेन स्टोक्सनं सामनावीर पुरस्कार पटकावला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या सुपर ओव्हरच्या थरारात चौकार षटकारांच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सला न्यूझीलंडने न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन दिलं आहे. मात्र, स्टोक्सने त्याच्याऐवजी केन विल्यम्सनला हा पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

बेन स्टोक्स आणि केन विल्यम्सनसह 10 खेळाडूंचे न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन झाले आहे. दरम्यान, स्टोक्सनं केन विल्यम्सन या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचं म्हटलं आहे. बेन स्टोक्स इंग्लंडसाठी खेळत असला तरी इथले लोक त्याला न्यूझीलंडचे मानतात असं न्यूझीलंड ऑफ द इयर पुरस्काराचे चीफ जज कॅमरॉन बेनट यांनी म्हटलं आहे. त्याच्याशिवाय 10 जणांचे नामांकन असून यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं सोशल मीडियावर म्हटलं आहे की, न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाल्यानं आनंदी आहे.

मला माझ्या मातृभूमीवर गर्व आहे पण या पुरस्कारासाठी मी योग्य नाही. माझ्याशिवाय अनेक लोक आहेत ज्यांनी न्यूझीलंडसाठी खूप काही केलं आहे. मी इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी मदत केली. सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहे. जेव्हा मी 12 वर्षाचा होतो तेव्हापासून इथं राहत आहे. मला वाटतं की पूर्ण देशानं न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला पाठिंबा दिला पाहीजे. त्याला न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यानं वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व केलं.विल्यम्सन वर्ल्ड कपमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.केन विल्यम्सनच या पुरस्काराचा खरा अधिकारी असून न्यूझीलंडच्या लोकांनी त्याला समर्थन द्यावं. माझंही मत त्यालाच जाईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत