बेस्ट संपाबाबत निर्णय १४ ऑक्टोबरला घेतला जाणार

मुंबई: महाराष्ट्र News 24  वृत्त 

वेतनकरार तसेच इतर मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा दिला होता. परंतु, ९ ऑक्टोबरला औद्योगिक न्यायालयातील सुनावणी आणि १४ ऑक्टोबरला कामगार आयुक्तांसोबतच्या चर्चेच्या फेरीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, संपावर आम्ही ठाम असल्याचे कामगारांनी सोमवारी समितीतर्फे परळ येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात स्पष्ट केले आहे.

बेस्ट बाबत  प्रशासन आणि कृती समितीमध्ये सामंजस्य करारावर संघर्ष निर्माण झाला आहे. समितीने वेगवेगळ्या मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर रोजी संपाचा इशारा दिला होता. त्यावर प्रशासनाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर ९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर  १४ ऑक्टोबरला कामगार आयुक्तांसमोरील बैठकीतील निष्कर्षांचाही आढावा घेतला जाणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेत १४ ऑक्टोबरला पुन्हा कामगार मेळावा घेतला जाणार असून त्यात सर्व मुद्दे चर्चेस येतील आणि कामगारांकडून त्याविषयी कौल जाणून घेतला जाईल, असे समितीतर्फे शशांक राव यांनी सांगितले. दरम्यान, कामगार संपावर जाण्याबाबतीत ठाम असल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत