बैल उधळल्याने बैलगाडी खाली चेंगरुन वधूच्या भावासह 15 जण जखमी; नाशिकमधील घटना

 
(रायगड माझा ऑनलाईन टीम)
 
मांडव मिरवणुकीदरम्यान बॅन्डच्या आवाजाने बैल बिथरुन उधळल्याने बैलगाडी खाली चेंगरुन वधूच्या भावासह 15 जण जखमी झाले. जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कुंभार्डे येथे आज (मंगळवार) सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सात गंभीर जखमींवर मालेगावच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू अाहे.
 
कुंभार्डे येथील दादाजी विष्णू केदारे यांच्या मुलीचा उद्या (बुधवारी) विवाह हाेणार अाहे. प्रथेनुसार लग्नाच्या एक दिवस अगाेदर घरसमाेर टाकलेल्या कापडी मंडपावर अांब्यांच्या पानांचा मांडव टाकला जाताे. यासाठी बैलगाडीतून अाणलेल्या मांडवाची सकाळी गावातून मिरवणूक काढण्यात अाली हाेती. बैलगाडीपुढे वाजणाऱ्या बॅन्डच्या ठेक्यावर काही जण थिरकत हाेते. यावेळी बॅन्डच्या अावाजाने गाडीला जुंपलेला एक अचानक बैल बिथरला. दाेन्ही बैल सैरभैर पळू लागल्याने नागरिकांची एकच धावपळ उडली. गाडीसह पळणाऱ्या बैलांनी अनेकांना तुडवले. यात वधूचा भाऊ गाेरख केदारे आणि बॅन्ड वादकांसह काही पाहुणे जखमी झाले. काही तरुणांनी पळणाऱ्या बैलांवर नियंत्रण मिळवून बैलगाडी थांबविली. गंभीर जखमींना मालेगावच्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात अाले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत