बॉक्सिंगपटू मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल

नवी दिल्‍ली : रायगड माझा ऑनलाईन

Image result for merry com

भारताची अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सहावे सुवर्णपदक पटकाविले होते. या विजयासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला होता. मेरी कोमने अशीच आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जागितक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) मेरी कोमने अव्वल स्थान पटकावले आहे.

गत वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दिल्‍ली येथे झालेल्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. तिच्या या कामगिरीमुळे ती या स्‍पर्धेतील सर्वात यशस्‍वी बॉक्सिंगपटू ठरली आहे. एआयबीएने जाहीर केलेल्‍या क्रमवारीत १७०० गुणांसह मेरी कोम पहिल्‍या स्‍थानावर पोहचली आहे.

मेरी कोमसह भारताच्या पिंकी जांगरा हिने ५१ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या मनीषा मौन हिने ५४ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर, सोनिया लाथर हिने ५७ किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत