बॉक्स ऑफिसवर ‘बधाई हो’चा धडाका सुरूच

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for badhaai ho movie 2018
प्रदर्शनानंतर तिसऱ्याच आठवड्यात १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार करणाऱ्या ‘बधाई हो’चा धडाका बॉक्सऑफिसवर सुरूच आहे. चौथ्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचत असून भारतातच नव्हे तर, परदेशातही हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे.

हटके कथेमुळं प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची हवा निर्माण झाली होती. प्रदर्शनानंतर अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांची चित्रपटाला दाद मिळू लागली. त्यामुळं तिसऱ्याच आठवड्यात हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये जाऊन बसला. त्यानंतरही घोडदौड सुरूच आहे. चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी चित्रपटानं १.२५ कोटींची कमाई केली. मंगळवारीही गर्दीचा ओघ कायम होता. त्यामुळं मंगळवारपर्यंत कमाईचा आकडा १०५.४५ कोटींच्या घरात पोहोचला आहे.

अमित रविंद्रनाथ शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, गजराज राव, नीना गुप्ता आणि सुरेखा सिक्री यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत