‘बॉम्बे बाजार’ला लागलेली आग आटोक्यात, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

पणजी : रायगड माझा वृत्त 

पणजी शहरातील ‘बॉम्बे बाजार’ या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बॉम्बे बाजारच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पणजीसह म्हापसा आणि ओल्ड गोवा केंद्रातील गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बॉम्बे बाजाराच्या तिसऱ्या मजल्यावर केवळ पत्रे लावून बेकायदेशीररित्या गोदामे तयार करण्यात आली असल्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या नेण्यात अडचण येत असल्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास उशीर झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत