बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्‍णालयात दाखल

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांची तब्‍येत खराब झाल्‍याने त्‍यांना लीलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती अस्‍वस्‍थ असल्‍याची माहिती ट्विटरवरून देण्‍यात आली आहे. त्‍यांची प्रकृती ठिक व्‍हावी, यासाठी त्‍यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

दिलीप कुमार यांच्‍या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्‍यात आलीय की, काल रात्री दिलीप कुमार यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ९५ वर्षांचे दिलीप कुमार यांना ३ महिन्‍यात दुसर्‍यांदा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. दिलीप कुमार निमोनियावर उपचार घेत आहेत.

गेल्‍या महिन्‍यात ५ सप्‍टेंबरला दिलीप कुमार यांना छातीत दुखू लागल्‍याने आणि छातीत इन्‍फेक्शनमुळे लीलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आलं होतं. त्‍याआधीही दिलीप कुमार यांना ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्‍यात दाखल करण्‍यात आलं होतं. डिहायड्रेशनमुळे त्‍यांची प्रकृती बिघडली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत