बोगस सरकारला परत निवडून द्यायचे का? उद्धव ठाकरेंचा कर्जतमध्ये घणाघात

कर्जत : अजय गायकवाड | भूषण प्रधान 

या बोगस सरकारला परत निवडून द्यायचे का? असा प्रश्न घेऊन वाड्यावस्त्यांवर  जाण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जतच्या जाहीर सभेत केले. हे सरकार निर्लज्ज असल्याचे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोंडसुख घेतले. 

( छायाचित्र : विपुल माळी )

खचाखच भरलेल्या कर्जतच्या पोलीस मैदानावर आज शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीरसभा झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर,  उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्यासह स्थानिक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

गेल्यावेळी थोडक्यात हुकलेली कर्जत नगर परिषदेची एकहाती सत्ता यावेळी देण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच केले. खात्यावर १५ लाख देण्याची घोषणा हा चुनावी जुमला असल्याचे सांगणारी  भाजपा म्हणजे निर्लज्ज पणाचा  कळस असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव यांचे भाषण केवळ हिंदुत्व, राफेल आणि केंद्र सरकार भोवती फिरत राहिले. कर्जत नगर पालिका वगळता स्थानिक राजकारणाला त्यांनी अजिबात स्पर्श केला नाही.

( छायाचित्र : विपुल माळी )

या व्यासपीठावरून ते किमान मावळ मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती मात्र तसेही झाले नाही. याच व्यासपीठावरून महेंद्र थोरवे यांना  विधानसभा उमेदवारीचे संकेत मिळण्याची अपेक्षा त्यांचे समर्थक करीत होते मात्र उद्धव यांनी कोणत्याही स्थानिक नेत्यांची नावे आपल्या भाषणात घेण्याचे खुबीने टाळले .

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेश टोकरे यांच्यावर रायगड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी याच व्यासपीठावरून देण्याची चर्चा देखील फक्त चर्चाच राहिली. एकूणच राज्य आणि राष्ट्रीय मुदयाबरोबर राफेल आणि राममंदिराच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करून भाजपासमोर मात्र  मोठे आव्हान उभे केले. मोठ्या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांना या भाषणाने कितपत प्रभावी केले हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

शेयर करा

2 thoughts on “बोगस सरकारला परत निवडून द्यायचे का? उद्धव ठाकरेंचा कर्जतमध्ये घणाघात

  1. बातमीतील महत्वाचा मुद्दा:
    राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेश टोकरे यांच्यावर रायगड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी याच व्यासपीठावरून देण्याची चर्चा देखील फक्त चर्चाच राहिली. एकूणच राज्य आणि राष्ट्रीय मुदयाबरोबर राफेल आणि राममंदिराच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करून भाजपासमोर मात्र मोठे आव्हान उभे केले. मोठ्या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांना या भाषणाने कितपत प्रभावी केले हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

  2. साडेचार वर्षापासुन या दोन्ही पक्षाला राममंदीर सुचले नाही आता ऐन निवडनुकिच्या वेळी केवळ चुनावी जुमला . अब कि बार राज सरकार ये है जनता की ललकार. जय महाराष्ट्र

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत