बोर्लीपंचतन बाजारपेठेत कापडी मखरांची  सजावट 

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

यंदा गणेश उत्सवासाठी बोर्लीपंचतन येथील खालीद साठी या व्यापाऱ्यांने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चक्क कापडी मखरांची सजावट केली असल्याचे पहावयास मिळत आहे.गणरायाच्या आगमनाला काही दिवस राहिले असल्याने गणेशउत्सवासाठी कापडी मखर (आरस)गणेशभक्तांसाठी बोर्लीपंचतन एस टी स्टँड डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी खालिद साठी या व्यापाऱ्यांने आपल्या कलाक्रुतीतुन कापडी मखर तयार करूंन गणेशभक्तांसाठी उपलब्ध केले आहे.
बोर्लीपंचतन बाजारपेठेत कापडी मखरांची  सजावट
या कापडी मखराचे वैशिष्ठे म्हणजे बाजारात मिळणाऱ्या थर्माखोल मकारापेक्षा या कापडी मखराची किंमत कमी असुन या मखरंची  उंची सहा फुट व रुंदी पाच बाय फुट आहे.तर ही मखरे वेगवेळ्या रंगाच्या कपड्यांनी तयार केली आहेत.पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच कमी खर्चात उपलब्ध असलेली ही मखरे घेण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातून गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत