बोर्ली ग्रामपंचायत कार्यालयातून परवाना गहाळ; कारभारावर संशय

 

मुरुड : अमुलकुमार जैन 

मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्राम पंचायत कार्यलयातून घर बांधणी परवाना गहाळ झाला असल्याने ग्राम पंचायतीच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे. बोर्ली ग्राम पंचायतचे लेखनिक  सागर माळजी हे शुक्रवार दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी फणसाड धरणावर कॅनल साफ करण्यासाठी व नळ जोडणीचे मुख्य वॉल साफ करण्यासाठी ,कोर्लई,आणि मांडला या दोन  ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यासोबत बोर्ली ग्राम पंचायत कर्मचारी म्हणून सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी नोंदवहीवर (मस्टर) हजेरी करून गेले होते.त्यावेळी बोर्ली ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम पंचायतअधिनियम सन १९५८ कलम५२प्रमाणे घरबांधणी/दुरुस्ती परवाना पुस्तक  तक्रारदार यांच्या टेबलावर होते.त्या परवाना पुस्तक मधील जावक क्रमांक ०३३ची शेवटची तारीख २७/०३/२०१८अशी होती.परवाना जावक क्रमांक३४चा परवाना अतिश जनार्दन कमाने ह्यांना देण्याच्या असल्यामुळे बोर्ली बोर्ली ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक अविनाश पिंपळकर यांनी परवाना क्रमांक३४वर स्वाक्षरी करून ठेवली होती. सोमवार दिनांक ९/४/२०१८ रोजी बोर्ली ग्राम पंचायत कार्यलायत सागर माळजी हे कामावर आले असता त्यांनी टेबल असलेले घर बांधणी दुरुस्तीचा परवाना पुस्तक उघडून पाहिले असता त्यामधील परवाना क्रमांक ३४ हा कोणीतरी फाडून नेल्याचे निदर्शनास आले.

 

मी फणसाड धरणावरून उशिरा आलो असल्याने तसेच शनिवारी आणि रविवार अशी सुट्टी असल्याने थेट सोमवारी  कार्यलायत गेलो असता माझ्या टेबलावर असलेले घर दुरुस्ती परवाना पुस्तक पाहिले .आणि ते चाळत असताना ग्रामविकास अधिकारी यांनी सही केलेला परवाना हा तिथे दिसला नाही म्हणून मी त्याचा शोध घेतला असता मला मिळून आले नाही.म्हणून मी ग्रामविकास अधिकारी यांना परवाना गहाळ झाली असल्याचे सांगितले.त्यावर त्यांनी सांगितले की,सदर परवाना गहाळ झाला आहे त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दे.म्हणून मी ऑन लाईन पद्धतीने तक्रार  केली आहे. | सागर माळजी.लेखनिक, ग्रुप ग्राम पंचायत, बोर्ली-मुरूड

पंचायत कार्यलयातून गहाळ झाला असल्याची माहिती मला ग्रामपंचायत लेखनिक सागर माळजी यांनी दिली होती.त्यावेळी सागर माळजी यांना सदर परवाना हा गहाळ झाला असल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याची सूचना केली होती.त्यानुसार माळजी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी त्यांची कारवाई करणे आवश्यक आहे. अविनाश पिंपळकर.प्रभारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्राम पंचायत बोर्ली-मुरूड.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत