बोर्ली स्थानक परिसरात पाण्याचे साम्राज्य!

मुरूड : अमूलकुमार जैन     

काल रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यातील बोर्ली स्थानकासहित परिसरात पाणी तुंबले होते.मात्र या कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.  

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी ह्यांच्याकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत असणाऱ्या गटारांची पाहणी करून त्याची खोली वाढविणे,त्यातील कचरा काढून टाकणे,तसेच काही ठिकाणी गटारांची दुरुस्ती करावयाची असेल ती करणे आदी कामे केली जातात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गटारांची पाहणी केली गेली नाही.त्यामुळे त्यांना वेळीच उपाययोजना करता आल्या नाहीत.

सात ते आठ वर्षांपूर्वी बोर्ली येथील स्थानकातील गटाराचे करण्यात आले होते. त्यावेळी गटाराचे उंची ही सहाफुट होती.मात्र आज त्याची उंची ही किमान दोन फुटापर्यंत राहिली आहे.या गटारालगत असणारे दुकानदार,रहिवासी हे आपला केर कचरा ह्या गटारात आणून टाकत असतात.त्याच प्रमाणे ह्या गटारावर बोर्ली विश्राम गृहापासून ते स्थानकापर्यंत सहा ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस फुटांचा सिमेंट काँक्रीटचे स्लॅब टाकण्यात आले आहे.त्यामुळे त्या स्लॅबखाली वाहत गेलेला कचरा काढता येत नसल्याने तो तिथे साचून राहिला आहे.त्यामुळे पावसाचे पाणी हे डोंगरातुन वाहून येऊन त्या गटारात येत असल्याने गटारातील पाण्याचा प्रवाह हा वाढत जातो.त्यामळे त्याला जाण्यासाठी वाट मिळत नसल्याने तो आपल्या सोबत असणारा गाळ,आणि कचरा हा रस्त्यावरून घेऊन जात असतो .पाण्याचा प्रवाह हा कमी झाला की तो कचरा त्याचठिकाणी साचून राहतो.आणि त्या कचऱ्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाहित स्थानिकांनाही होत आहे.गेल्या चारपाच वर्षांपासून बोर्ली स्थानकात येणाऱ्या मुसळधार पावसामुळे तीन ते चारफुट पाणी साचले होते. मात्र ह्यावर्षी अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.