ब्राझीलमध्ये सापडले वाळवीचे डोंगर

ब्राझील : रायगड माझा ऑनलाइन 

ब्राझील मधील एका जंगलात वाळवीने जमीन पोखरून तयार केलेले डोंगर सापडले आहेत. हे डोंगर 8 ते 60 फूट उंचीचे असून 30 फूट रुंद आहेत. 88 हजार चौरस मैल क्षेत्रफळात हे डोंगर विखुरले असून हे क्षेत्रफळ अमेरिकेच्या मिनेसोटा राज्याएवढे आहे. यातील सर्वात जुना डोंगर हा 3800 वर्षांपूर्वीचा आहे. ब्रिटन युनिव्हर्सिटी ऑफ सलफोर्डचे तज्ज्ञ जे. मार्टीन यांनी या डोंगराचा शोध लावला आहे.

गीजा येथील 4000 पिरॅमिड्स एवढे यांची संख्या आहे. मार्टीन आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने करंट बायोलॉजी या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित पुस्तकात याबदद्ल माहिती दिली आहे. मार्टीन आणि त्यांच्या टीमने 11 डोंगरांचे नमुने गोळा केला आहेत. यात असलेल्या रेडिएशन आणि मिनरल्सवरून हे डोंगर किती वर्षापूर्वींचे आहे यावर संशोधन करण्यात येत आहे. यातील एक डोंगर 3800 वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. काही ठराविक अंतरावरील प्रत्येक झाडाभोवती असे डोंगर वाळवीने तयार केल्याचे मार्टीन यांनी करंट बायोलॉजीमध्ये म्हटले आहे. तसेच या जंगलातील प्रत्येक झाडाखाली नवीन विश्व सापडेल असा दावाही त्यांनी केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत