ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील – गुलाबराव पाटील 

नाशिक : रायगड माझा वृत्त 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलंय. राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का? असा प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

मागच्या विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावं लागेल”. त्याचबरोबर आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवर निशाणा साधला. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध स्त्री असायची, आता मॉडेल दिसते असं पाटील म्हणाले. पेट्रोलचे दर गगनाला भिडले तरी लोक भाजपलाच पसंत करतायत अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत