ब्रिजवाडी येथे अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार

father's rape on a minor girl at Bridgewadi Aurangabad | ब्रिजवाडी येथे अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त

नराधम बापाने पोटच्या मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीस सिडको एमआयडीसी पोलिसांनी केले अटक केली आहे.

ब्रिजवाडी येथे सोमवारी दुपारी नराधम बापाने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत १२ वर्षाच्या मुलीवर जबरी अत्याचार केला. मुलीचा बचावासाठी आरडाओरडा ऐकून तिची आई तसेच इतर नागरिक मदतीला धावून आले. यानंतर त्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती पोलिसांना दिली असता सिडको एमआयडीसी पोलिसांनी पलायन करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत