ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोनाचे थैमान; भारतात येणारी विमान सेवा बंद करावी!

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

कोरोना संकट: आईएटीए ने कहा- भारतीय विमानन क्षेत्र में 20 लाख लोगों की  नौकरियों को ख़तरा

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युरोपीयन देशांसह इतर देशांनीही ब्रिटनमधील विमान सेवेवर बंदी घातली आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरतं मर्यादित न राहता इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत फैलावला आहे.

भारतात मात्र कोरोनाची लाट आता ओसरली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुसरी लाट येण्याची शक्यताही मावळली आहे. पण, आता जर दुसरी लाट आलीच तर त्याचा धोका पहिल्यापेक्षा जास्त असण्याची भीती वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून युकेतून येणारी विमान सेवा बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

युकेमध्ये कोरोनाची लाट पुन्हा आली आहे. त्यामुळे युकेमधून भारतात येणारी विमान सेवा बंद ठेवली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत