ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांना बसची धडक

नेवासे नगर: महाराष्ट्र News 24

आज सकाळी एस टी बसचे ब्रेक फेल झाल्याने औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांना बसची धडक बसल्याने एसटीसह तीन वाहनांचे नुकसान झाले.

नेवासे आगाराची बस क्रमांक एमएच १४ बीटी ७८१ ही नेवासे येथून सकाळी शेवंगावकडे जाण्यास निघाली. नेवासे फाटा येथील चौकात साडे सात वाजता एसटी बस आल्यानंतर बसचे ब्रेक न लागल्याने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या काळ्या पिवळ्या रंगाच्या प्रवासी वाहतूक करणारया तीन जीपला धडक बसली. एसटीची धडक इतकी जोरदार होती की तीन वाहनांना धडक देऊन विटांची संरक्षक भिंतही पडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. नेवासे फाटा येथील चौकात कायम गर्दी असते. बस चालक तसेच वाहक हे जखमी झाले आहेत. त्यांना नेवासे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळी नेवासे डेपोतून बस काढताना ब्रेक फेल असल्याचे सांगितले होते. ब्रेक कॉप्रेसरचे ऑइल लीक आहे असे सांगूनही बस डेपोतून बाहेर कशी काढण्यात आली आणि नेवासे महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे विध्यार्थी उतरले तेव्हा ब्रेक लागत नसल्याचे जाणवले असे प्रवाशांनी घटनेनंतर सांगितले. बसचा स्टेअरिंग रॉड ही तुटलेला होता. एवढा निष्काळजीपणा प्रवाशाच्या अंगाशी आला असता तर मोठी घटना झाली असती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत