ब्रेक फेल झाल्याने लक्झरी बस दरीत कोसळून चार ठार, 20 जण जखमी

नाशिक : रायगड माझा

हतगड-दळवट-कनाशी राज्य महामार्गावर लक्झरी बस ३० फूट खोल दरीत कोसळून गुजरातमधील नवसारी येथील ४ भाविक ठार तर २० जखमी झाले. मृतांत २ महिलांसह २ मुलांचा समावेश आहे. हिल ट्रॅव्हल्सची बस सप्तशृंगी गडाकडे जात होती. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास गायदरपाडा घाटात धोकादायक वळणावर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ती दरीत कोसळली.

यात जेलिबीन मुकेशभाई पटेल (४०), पलकुलबेन पटेल (३०), जेनिलकुमार मुकेशभाई पटेल (४) आणि तन्मय पंकज पटेल (७) ठार झाले. निरुबेन पटेल, विशाखा पटेल, जयेश ओम पटेल, नरेश रामा पटेल, दमयंती पटेल, चंद्रकांत भैया, मयुरी पटेल, शमी पटेल, लक्ष्मी गोपाल पटेल, प्रतिभा पटेल, श्यामा भैया, प्रियंका भारत, नन्साराम पटेल, लक्ष्मी पटेल, पंकज पटेल, प्रियंका पटेल, मयंत्री किशोर पटेल, कला महेश पटेल, ज्योती चिमना पटेल, बेनुबेन पटेल, तन्मय पंकज पटेल हे जखमी झाले असून त्यांना बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत