ब्लाइंड वर्ल्डकप : पाकिस्तानवर मात करत भारताने कोरले विश्वचषकावर नाव

(रायगड माझा ऑनलाईन)

भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानातही पराभवाची धूळ चारली आहे. भारताने शनिवारी पाकिस्तानवर दोन विकेटने मात करुन सलग दुस-यांदा अंधांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली.
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. पाकिस्तानने निर्धारीत 40 षटकात आठ बाद 308 धावांचा डोंगर उभारला. भारताने 38.2 षटकात आठ गडी गमावून हे आव्हान पार केले. भारताकडून सुनील रमेशने 93 आणि अजय रेड्डीने 62 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून बादर मुनीरने 57, रियासत खान आणि कर्णधार निसार अलीने 48 आणि 47 धावा केल्या. उपांत्यफेरीत श्रीलंकेला 156 धावांनी नमवून पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने उपांत्यफेरीत बांगलादेशवर सात विकेटने विजय मिळवून थाटात अंतिम फेरी गाठली होती. गतविजेत्या भारताने साखळी सामन्यात 13 जानेवारीला पाकिस्तानवर सात विकेटने विजय मिळवला होता.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत