भंगार गोळा करणाऱ्या महिलेला सापडली ४३ जिवंत काडतुसे

पिंपरी-चिंचवड : रायगड माझा वृत्त 

भंगार आणि प्लास्टिक गोळा करणाऱ्या एका महिलेला चिंचवडजवळील रेल्वे रुळांलगत काल संध्याकाळी ४३ जिवंत काडतुसे सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

या काडतुसांवर मेड इन बेल्जियम १२ आणि मेड इन यूएसए असा उल्लेख होता. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या कमल रघुनाथ कांबळे (वय ५८) या भंगार आणि प्लास्टिक गोळा करण्याचं काम करतात. त्यांना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास चिंचवडजवळील पुलाखाली रेल्वे रुळांलगत एका लाल रंगाची कापडी पिशवी दिसली. ती पाहिली असता, त्यात ४३ जिवंत काडतुसे सापडली.

३०३ (राऊंड)ची २६ जिवंत काडतुसे आणि त्यावर इंग्रजीत KF 99 तर, १० काडतुसे ही चंदेरी रंगाची होती. त्यावर मेड इन बेल्जियम १२ असा उल्लेख आहे. तर इतर सात काडतुसे लाल रंगाची आहेत. त्यावर इंग्रजीत वेस्टर्न सुपर नंबर १२ मेड इन यूएसए असं लिहिलेलं आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर ती काडतुसं पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत