भंडारवाडी येथे घरफोडी, ८० हजाराचे सोने पळवले

लातूर : रायगड माझा वृत्त
लातूर जिल्ह्यात बंद घरे फोडण्याची चोरट्यांनी मोहिमच उघडलेली आहे. रेणापूर तालूक्यातील मौजे भंडारवाडी येथील बंद घर फोडून ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने चोरट्यांनी पळवले आहेत.

या प्रकरणी सुरेश नागनाथ शेळके रा. भंडारवाडी यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. कपाट्याच्या बॅगमध्ये ठेवण्यात आलेले चार तोळयाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी उस्तुर्गे हे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत