भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीच लढवणार!

रायगड माझा वृत्त :

भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज यावर शिक्कामोर्तब केलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी निर्णय जाहीर केला. तर भंडारा-गोंदिया निवडणुकीसाठी येत्या ९ तारखेला उमेदवार घोषित करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

ncp praful patel will contest bhandara gondiya bypoll

राहुल गांधी यांचा निर्णय आपल्याला मान्य आहे. आता जागा निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल, असं नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या भेटीनंतर सांगितलं. दरम्यान, पालघरमध्येही लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा काँग्रेस लढणार आहे.

भाजपला राम राम करत नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे ही जागा रिकामी झाली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नाना पटोले हे भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला होता. यामुळे नाना पटोलो यांना उमेदवारी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेला सोडल्याचं स्पष्ट झालं. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ मे रोजी होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत