भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर; भाजप पिछाडीवर

भंडारा : रायगड माझा वृत्त  

मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मारल्याचे चित्र असून, भाजप पिछाडीवर आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी पुन्हा 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाच्या दिवशीही अनेक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक मतदान यंत्रांमुळेच जास्त गाजली होती.

नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत