भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे 42 हजार मतांनी विजयी

नागपूर : रायगड माझा

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आहे. मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजिनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली.

भंडारा गोंदियाच्या पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडली. त्यामुळे काल (बुधवारी) 49 मतदानकेंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. ह्या मतदारसंघामध्ये सध्या भंडारा जिल्ह्यामधील ५ व गोंदिया जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. या निवडणुकीत एकूण 24 उमेदवार होते. भाजपाने हेमंत पटले यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती.

सर्वांचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत पटले यांचा पराभव केला. या पराभवाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपकडे असलेली जागा खेचून आणली असून विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका खासदाराची भर पडली आहे.

साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अखेरपर्यंत अटीतटीचा सामना झाला. निवडणुकीपूर्वी भाजपचे हेमंत पटले यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात होते. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतल्या. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जवळपास 50 सभा घेतल्या. यानंतरही राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपवर बाजी उलटविली. मधुकर कुकडे यांनी हेमंत पटले यांचा 42 हजार मतांनी पराभव केला.

भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून खळबळ उडवून दिली होती. यानंतर काही महिन्यांनी त्यांनी पक्षाचा तसेच खासदारकीचा राजीनामा दिला होता. ही पोटनिवडणूक नाना पटोले यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.

पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील लोकांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला होता. विश्‍वासघात करणाऱ्याला नेत्याला धडा शिकवा, असे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाकडे या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. मधुकर कुकडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. पहिल्या फेरीत कुकडे यांना केवळ 275 मतांची आघाडी होती. ही आघाडी अखेरच्या फेरीत 27 हजारांपर्यंत पोहोचली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.