भयंकर! 62 वर्षीय म्हाताऱ्याचा 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

एका 62 वर्षांच्या म्हाताऱ्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना दिल्लीतील पहाडगंज येथे घडली आहे. सतीश असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता ही गाझियाबाद येथील रहिवासी असून 11 जानेवारी रोजी घरातून भांडून बाहेर पडली होती. घरच्यांवर रागवून ती गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. रेल्वे स्टेशनवर ती एकटीच रडत बसलेली असल्याचं सतीशला दिसलं. त्याने विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिला दिल्लीला सोबत चलण्यासाठी विचारलं. आधी पीडिता त्याला नाही म्हणाली. पण, त्याने तिला दिल्लीला जाण्यासाठी राजी केलं. सतीश तिला घेऊन पहाडगंजला आला. त्याने तिथे एक हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिला प्राणिसंग्रहालय दाखवण्यासाठी घेऊन गेला आणि तिथूनच फरार झाला.

सतीश गायब झाल्याचं पाहून मुलगी रडू लागली. तिने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला शोधण्यासाठी पोलीस स्थानक गाठलं. जेव्हा पोलिसांनी मुलीची चौकशी केली तेव्हा तिच्यावर झालेल्या बलात्काराचा उलगडा झाला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सतीशवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत त्या हॉटेलपर्यंत पोहोचले, जिथे सतीश मुलीसह थांबला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून सतीशची ओळख पटवली आणि हॉटेलच्या रेकॉर्डवरून त्याची माहिती मिळवत त्याला अटक केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत