भयानक ! ७ वर्षाच्या चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या , मृतदेह फेकला जंगलात

मुंबई : रायगड माझा वृत्त 
अंबरनाथमध्ये एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे अवघ्या सात वर्षाचा चिमुरड्याची अमानुषपणे हत्या करणात आली आहे. अजून पर्यंत अद्यापत हत्येचं कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारावर तपास सुरू केला आहे.
घटना अंबरनाथच्या डोंगराळ भागातली आहे. इथे गुरुवारी सकाळी सात वर्षाच्या शिवम दिग्विजय रजकचा मृतदेह बुवापाडा खदानमध्ये सापडला. शिवमच दगडाने डोक ठेचून हत्या करण्यात आली आहे.
शिवम बराच वेळ घरी न दिसल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शक्य तेवढ्या ठिकाणी शोध घेतल्या नंतरही या चिमुरड्याचा शोध लागला नाहीं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पण शिवमचा संगळ्या ठिकाणी शोध घेतला. यादरम्यान, बुवापाडा खदानमध्ये एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शिवमचाच असल्याची खात्री कुटुंबीयांनी करून करण्यात आली.
अंबरनाथ पोलिसांनी शिवमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अजूनपर्यंत यात कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
यादरम्यान, शिवमचा हत्येमुळे अंबरनाथ परिसरात शोककळा पसरली आहेत. शिवम आपल्यात नसल्याने संगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. ​नेमक्या कोणत्या कारणावरून ही हत्या करण्यात आली याच गुढ अद्याप कायम आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत