भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

इंदूर : रायगड माझा 

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर आलीय. या प्रकरणाच्या संशयाची सुई आता मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचल्याचं कळतंय.

मध्यप्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे आता भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. जे सेवादार, बांधकाम व्यावसा‍यिक भय्यू महाराजांना वारंवार फोन करत होते, ते आता संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. जमीन आणि स्टॅम्प हेराफेरीचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, वैयक्तिक ताण-तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं, मात्र आत्महत्येचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.