भरधाव कारची ऑटोरिक्षाला धडक; भीषण अपघातात ४ जागीच ठार

औरंगाबाद: महाराष्ट्र News 24 वृत्त

औरंगाबाद-जालना मार्गावर आज (बुधवार) सकाळी ९. ४५ च्या सुमारास भीषण अपघात झाला. औरंगाबाद-जालना रोडवरील शेकटा गावाजवळ हा अपघात झाला.

या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. भरधाव कारने एका ऑटोरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला. चारही मृत ऑटोरिक्षात बसले होते. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत