भरधाव कारने सात ते आठ जणांना दिली धडक; दोघांचा जागीच मृत्यू ५ जण जखमी

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

काल संध्याकाळी साडे सातच्या सुमारास कामोठे येथे भरधाव कारने सात ते आठ जणांना धडक दिल्याची थरारक घटना घडली. या घटने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

   

कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला. भरधाव वेगात येणारी स्कोडा कार समोरून येणाऱ्या ४ दुचाकी तसेच पादचारी व स्कूल बसला धडकली. घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्यानं हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाचा शोध सुरु आहे. तसेच या अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झालं आहे.

सार्थक चोपडे (वय ७) व वैभव गुरव (वय ३२) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर, साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय १६), आशिष पाटील (२२) आणि प्रशांत माने हि अपघातात जखमी झालेल्यांची नवे आहेत. जखमींना कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत