भरधाव पाण्याच्या टँकरची रिक्षाला भीषण धडक; नऊ जणांचा जागीच मृत्यू; दोन गंभीर

पैठण:रायगड माझा 

 भरधाव पाण्याचा टॅंकर आणि ऑटो रिक्षाच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागेवर मृत्यू झाला. औरंगाबाद-पैठण रोडवर गेवराईतांडा येथे शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेदरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षात बसलेल्या नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलेचा समावेश आहे.

जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आलेआहे. गेवराई तांड्याजवळील बंजारा हॉटेल समोर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बिडकीन, चिकलठाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शेख आमेर शेख मकसुद (२७, रा. जुना बाजार, औरंगाबाद), शेकू तुकाराम त्रिबंके (७५, मातोश्री वृध्दाश्रम), शिवलालसिंग गुलाबसिंग ठाकुर (८४, रा. मातोश्री वृध्दाश्रम), रामकुमारी प्यारेलाल ठाकुर (६०, रा. बिडकीन), राममहेश प्यारेलाल ठाकुर (४०, रा. बीडकीन), युवराज राममहेश ठाकूर (3, रा. बिडकीन), पुष्पा राममहेश ठाकूर (35, रा. बिडकीन), जनार्दन नाथा अवचरमल (४८, चितेगाव), अनूजा सुनिल अवचरमल (११, रा. शाहीनगर) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत