भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

न्हावाशेवा : रायगड माझा वृत्त

उरण- पनवेल रोडवर दास्तान फाटा जवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. धर्मेंद्रसिंग प्रतापसिंग ठाकूर (54) असे या व्यक्तीचे नाव आहे. धर्मेंद्रसिंग ठाकूर हे जेएनपीटीमध्ये नोकरी करत होते. धर्मेद्रसिंग ठाकूर हे स्कूटीने आपल्या घरी परतत असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या बाबत बुधवार 30 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.जी. काठे हे अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत