भररस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या महिलांना अटक

दिल्ली : रायगड माझा वृत्त

दिल्लीच्या रोहिणी परिसरात भररस्त्यावर पुरुषांकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. या महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

रोहिणी परिसरात भररस्त्यामध्ये या महिला येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांकडे पाहून अश्लील चाळे करायच्या. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भरपूर त्रास व्हायचा. मंगळवारी सकाळी पोलिसांना काही लोकांनी या परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. या महिलांची चौकशी सुरू असून अजूनतरी वेश्या व्यवसाय करत असल्याच्या बाबीला त्यांनी कबुली दिलेली नाही. ‘ या महिलांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्या व्यवसायाबद्दल आम्ही तपास करत आहोत.’ अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत