भर वर्गात किस करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

अहमदाबाद : रायगड माझा वृत्त 

भर वर्गात किस करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

गुजरातमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर एका महिलेला किस करतानाचा शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरातमध्ये व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांची याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ आधी स्थानिकांपर्यंत पोहोचला आणि मग बघता बघता संपूर्ण गुजरातमध्ये व्हायरल झाला. शिक्षण अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडिओत शिक्षकाचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसल्याने त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वर्गात लपवून ठेवलेल्या मोबाईलमध्ये हे संपूर्ण दृष्य कैद झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत