भांडुप मधील नागरिकांनी वाढीव विजबील भरू नका!; मनसे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांचे आवाहन

भांडुप : किशोर गावडे (प्रतिनिधी)

वचननाम्यात वीज बिल सवलतीचे आश्वासन देत जनतेला फसविण्याचा प्रयत्न करणा-या शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. भांडुप मधिल नागरिकांनी कोणीही वाढीव विजबील भरू नका! तक्रार असल्यास मनसे शाखेत संपर्क साधावा. असे मनसे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वचननाम्यात 300 युनिट पर्यंत 20% टक्के सवलत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तसेच दिवाळीच्या दरम्यान 100 युनिट पर्यंत विज बिलात सवलत देऊ, असे आश्वासनही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात वचननाम्यात

आश्वासन दिल्याप्रमाणे जनतेला फसविण्याचा प्रयत्न केला. वीज बिल वाढवणाऱ्या वचनभंग करणा-या सरकार विरोधात सोमवार नंतर राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहतोय,असे भांडुप विभागाचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी सांगितले.

शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विज बिल माफी करणार अशी घोषणा करून आणि ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली. त्याविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे देतील तो आदेश शिरसावंद्य मानून भांडुप विधानसभा मतदार संघात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खरमरीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी दिला आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे खळखट्टाक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जळगावकर यांनी दिला आहे.

सोमवारी राज ठाकरेंनी आदेश केल्यानंतर मोर्चा किंवा अन्य आंदोलन केले जाईल. हे वीज बिल आंदोलन जनतेला घेऊन केले जाईल,असा इशारा जळगावकर यांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत