भागडीतील कार्यकर्त्यांची शिवसेना सोडचिठ्ठी

मंचर : रायगड माझा

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील भागडी ग्रामपचांयतीचे सदस्य तथा शिवसेनेचे कार्यकर्ते व उद्योजक तबाजी उंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मंचर येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवदी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी भागडीचे माजी सरपंच आणि उद्योजक किसन उंडे उपस्थित होते. तबाजी उंडे यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्या माया थिटे, मनिषा बोरकर, रामदास उंडे, अजित गवारी, गोरख उंडे, सुदाम उंडे, राजेद्र उंडे, नवनाथ उंडे, अनिकेत उंडे, शिवाजी आगळे, संदीप उंडे, पांडुरंग उंडे आदीं कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, युवक अध्यक्ष निलेश थोरात, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी संचालक किसन लोखंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय गवारी, उद्योजक दत्ता बांगर उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत