भाजपचे अामदार आशिष देशमुखांचा राजीनामा

नागपूर : रायगड माझा ऑनलाईन 

काटोल मतदारसंघाचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी वर्ध्याला होणाऱ्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला आशिष देशमुख हजेरी लावणार आहेत. विदर्भातील नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुखही आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज होते. देशमुख हे वेगळ्या विदर्भासाठी सातत्याने आग्रही होती. त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. मात्र त्याला थंडा प्रतिसाद दिल्याने ते भडकले होते. ‘प्रत्येक चित्रपटाचा क्लायमॅक्स वेगळा असतो. माझ्या जवळ सर्व पर्याय खुले आहेत. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. या इशाऱ्याकडे भाजपने ढुंकुनही न बघितल्याने देशमुख अधिकच संतापले होते.

देशमुख यांनी जानेवारी महिन्यात विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागात आत्मबळ यात्रा काढली होती. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांचे बालेकिल्ले असलेल्या विदर्भातच भाजपा आमदाराने आत्मबळ यात्रेचा श्रीगणेशा केल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला होता. सप्टेंबर महिन्यात देशमुख यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत केंद्रातील आणि राज्यातील सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात कमी पडल्याची टीका केली होती.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत