भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे घेणार कणकवली मध्ये जाहीर सभा

कणकवली: महाराष्ट्र News 24 वृत्त 

शिवसेनेला तीव्र विरोध असतांनाही भाजपच्या कणकवली मधून नितेश राणे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना-भाजप मध्ये वादाचे ठिणगी पडली आहे. शिवाय नितेश राणे यांची जिरवण्यासाठी स्वता उद्धव ठाकरे यांनी कणकवलीमध्ये जाहीर सभा घ्यावी अशी गळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना घातली आहे. यामुळे उद्धव ठाकरे कणकवलीमध्ये सभा घेणार असल्याचे माहिती मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे.यामुळे भाजपच्या वाटेवर असणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने जोरदार विरोध केला. नारायण राणे यांचा जरी भाजपत प्रवेश झाला नसला तरी त्यांचे सुपूत्र नितेश राणे यांना भाजप ने प्रवेश देऊन कणकवली मधून उमेदवारी ही दिली. नितेश राणे यांच्या उमेदवारीला शिवसेनेने विरोध करत सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. यामुळे कणकवली मध्ये राणे विरुद्ध सावंत असा सामना रंगणार आहे. नितेश राणे यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. भाजपचे इच्छुक उमेदवार संदेश पारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सतीश सावंत यांना जाहिरपणे आपला पाठिंबा दिला. यामुळे नितेश राणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून ही त्यांची डोकेदुखी वाढली आहे. सतीश सावंत हे मराठा तर संदेश पारकर हे वैश्य वाणी असल्याने याचा देखील फटका हा नितेश राणे यांना बसणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत