भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव यांची भेट

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीचा तपशील कळू शकला नसला तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय चर्चेसाठीच असल्याचे सांगितले जात आहे.

murli manohar joshi met uddhav

बुधवारी सकाळी मुरली मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुरली मनोहर जोशी यांचा चांगलाच संपर्क होता. २०१४मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाला. हे दोन्ही पक्ष राज्यात आणि केंद्रातील सत्तेत एकत्र असले तरीही आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका एकत्रित लढवायच्या की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मुरली मनोहर जोशी यांनी उद्धव यांची भेट घेतल्याने या भेटीत निश्चितच राजकीय चर्चा झाली असणार असा तर्क मांडला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत