भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिले : शरद पवार

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

झारखंड विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये सत्ताधारी भाजपला धक्का बसला असून झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व मित्रपक्षाचे सरकार स्थापन होण्याची चिन्हं आहेत. या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. झारखंडच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा व आघाडीची सरशी होत असून भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

निवडणुकीत आपण कसेही जिंकू येऊ, असा अहंकार भाजपने दाखवला. मात्र, झारखंडच्या जनतेने त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर होते. निवडणुकीनंतर या राज्यात बदल झाला असून भाजप सत्तेतून पायउतार झाला आहे. देशात होत असलेल्या बदलाच्या प्रवाहात झारखंडही सहभागी झाले असून आपण जनतेचे आभार मानत असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत