भाजपच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय : सोनिया गांधी

सातत्याने पराभव झेलत असलेल्या काँग्रेसने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या झंझावाती यशावर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला. खास करून हिंदी भाषिक प्रदेश असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मिळवलेल्या यशाने त्या आनंदित झाल्या आहेत.

भाजपच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय असल्याची प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. निकालांवर खूष असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांपासून म्हणजेच मोदी दिल्लीत विराजमान झाल्यापासून काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

एका पाठोपाठ एक राज्य गमावल्यानंतर राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात होते. राहुल काँग्रेस अध्यक्ष पदावर विराजमान होऊन कालच एक वर्ष पूर्ण झाले. राहुल यांना २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी नवसंजीवनी देऊ शकत नाही. सलग १९ वर्ष काँग्रेस अध्यक्षपदी राहिल्यानंतर सोनिया यांनी राहुल यांच्याकडे गेल्यावर्षी पदभार दिला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत