भाजपच्या नगरसेवकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल!

यवतमाळ : रायगड माझा वृत्त 

तरुणीसोबत मैत्री करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत असतत पाच वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजप नगरसेवकाला तरुणीच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली असून लोकप्रतिनिधीवर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

शहरातील गणेश सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेली २२ वर्षीय तरुणी बीएससीमध्ये शिकत आहे. ती दहावीत असतांना शिकवणीकरिता जात असतांना वणीचे भाजप नगरसेवक धीरज दिगंबर पाते वय (२९, रा.वासेकर ले आउट) हा नेहमी तिचा पाठलाग करायचा. त्याने चिठी देऊन पीडित तरुणीला मोबाईल नंबर वर फोन करण्यास सांगितले. तरुणीने प्रतिसाद न दिल्याने तो वारंवार तिचा पाठलाग करून तू माझ्याशी का बोलत नाहीस असे म्हणत तिच्याशी जवळीक साधली. काही दिवसांनी या दोघांत मैत्री झाली. तरुणी येथील एका महाविद्यालयात बारावीत शिकत असताना धीरजने तिला आपल्या एका मित्राच्या घरी नेले. घरी कोणीच नसल्याचे पाहून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक सबंध प्रस्तापित केले.

यानंतर धीरजने तिला धमकावले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तसंच, तिची कागदपत्रं मिळवून त्या आधारे तिचं मतदान ओळखपत्र तयार केलं आणि त्याच्यावर स्वतःचा पत्ता टाकला. तसंच तिचं फेक फेसबुक अकाउंटही उघडलं. यामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्या कुटुंबीयांना या प्रकरणाची कल्पना दिली. कुटुंबीयांनी धीरजशी संपर्क करून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे देण्याच्या बदल्यात धीरजने पाच लाख रुपयांची मागणी केली आणि मागणी मान्य न केल्यास बदनामी करण्याची धमकीही दिली.

पीडित तरुणीने शनिवारी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नगरसेवक धीरज पाते याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वीही लैंगिक अत्याचार प्रकरणात होता सहभाग 

शहरात मागील सहा महिन्यांपूर्वी एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत या धीरजनेही त्या काँग्रेस कार्यकर्त्याला अत्याचारात मदत केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी मात्र धीरजअटकपूर्व जामीन मिळविण्यात यशस्वी झाला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत