भाजपने आत्मचिंतन करावे : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. मतमोजणीचा कल पाहता भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला आता आत्मचिंतनाची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला.

मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवन्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकासआघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमधील भाजपच्या परिस्थितीवर बोलताना संजय राऊत यांनी भाजपने महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लावलेली ताकद फुकट गेली असल्याचे टोला हाणला आहे. झारखंडचा निकाल अपेक्षित होता. महाराष्ट्रासोबत झारखंडही गमावावे लागल्याने भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत