भाजपने आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली – राहुल गांधी

बंगळुरू:रायगड माझा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. ‘आम्ही कर्नाटकात फिरलो. लोकांशी चर्चा केली आणि नंतरच आमचा निवडणूक जाहीरनामा तयार केला. भाजपनं मात्र आमच्या अनेक गोष्टी कॉपी केल्या, आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली,’ असा दावा राहुल गांधी यांनी केला.

बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. ‘या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपनं शिष्टाचार पाळला नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका करण्यावर अधिक भर दिला. आम्ही मात्र मुद्द्यांवर निवडणूक लढत होतो,’ असं राहुल यांनी सांगितलं. भाजपच्या दोन-चार नेत्यांनी केवळ अर्ध्या तासांत त्यांचा जाहीरनामा तयार केला. आमच्या जाहीरनाम्याचीच नक्कल केली. त्यामुळे कर्नाटकात आमचा विजय निश्चितच आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत