भाजपमुळेच युती लटकलेल्या अवस्थेत: उद्धव ठाकरे

मुंबई: रायगड माझा वृत्त

भाजपच्या राजकीय धोरणांमुळेच महाराष्ट्रात युती लटकलेल्या अवस्थेत असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

युतीच्या अस्थिरतेची बीजं भाजपनेच २०१४मध्ये रोवली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शनिवारी पुण्यात एका सभेमध्ये राज्यातील ४८पैकी ४३ जागा भाजप जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या ‘निर्धाराचा’ही त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ एकीकडे ४३ जागा जिंकण्याचा निर्धार करायचा तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी युती करण्याच्या गोष्टी करायच्या. एकदा नक्की काय ते ठरवा’ अशी ताकीदच या अग्रलेखात देण्यात आली आहे. तसंच राज्यातील समस्यांचा आढावा घेत भाजप सरकारच्या निष्क्रीयतेवर बोटं ठेवलं आहे. सत्ता सगळ्यांना हवी असते पण सत्तेच्या नशेत राहणं योग्य नाही अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

– सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे.

– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे मुक्कामी श्री. फडणवीस यांनी नारा दिला आहे की, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा जिंकू.’’ फडणवीस यांचा असाही दावा आहे की, . खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे 48 जागा हे लोक सहज जिंकू शकतात व देशात स्वबळावर 548 जागा कुठेच गेल्या नाहीत. ‘ईव्हीएम’ आणि असा हा फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल, पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या.

– अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, पण ‘‘याला पाडू, त्याला पाडू, त्याला गाडू’’ वगैरे भाषा सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहेत. पाडापाडीची भाषा यांच्या तोंडात इतकी रुळली आहे की, एखाद दिवस ‘स्लिप ऑफ टंग’ होऊन स्वतःच्याच अमुक-तमुक लोकांना पाडू असे यांच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणजे झाले. राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे.

– महाराष्ट्रात थंडीच्या लाटेने पिकांवर बर्फाचा थर साचला आहे. अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. त्याप्रमाणे सत्ताधार्‍यांची बुद्धीच थंडीने गोठली व राजकारण बिघडले असे काही झाले आहे काय? शेतकरी आज संकटात आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या तोंडास केंद्राने पाने पुसली. त्यावर जोरात बोलायचे सोडून ‘‘याला पाडा, त्याला गाडा’’ हेच पालुपद सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे प्रकरण लटकलेल्या अवस्थेत आहे, पण ही स्थिती आम्ही निर्माण केली नसून 2014 साली या पापाची बीजे भाजपने रोवली आहेत.

– एका बाजूला 48 पैकी 43 जागा जिंकण्याची आरोळी ठोकायची व दुसर्‍या बाजूला शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्यावर ‘युती’ व्हायलाच पाहिजे असे बोलायचे. एकदा नक्की काय करायचे ते ठरवा. भरकटल्यासारखे बोलत राहिल्याने लोकांतील उरलीसुरली पतही निघून जाईल. काय जिंकायचे ते जिंका, पण महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांचे काय? नगर जिल्ह्यातील पुणतांबे येथे शेतकर्‍यांच्या मुलींनी आंदोलन सुरू केले. उपोषणास बसल्या या कन्या. ते आंदोलन चिरडण्यासाठी जे सरकार पोलिसी बळाचा वापर करते त्यांच्या तोंडी जिंकण्याची भाषा शोभत नाही.

– शेतकर्‍यांच्या लेकी-सुनांनाही गाडा हाच संदेश सरकार देत आहे. कांद्याला फक्त साडेसात पैसे भाव मिळत आहे. दुधावरील जीएसटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनाथाश्रमांच्या दत्तक केंद्रांमध्ये गेल्या चार वर्षांत एक हजारावर बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा रिकाम्या आहेत. त्या भराव्यात म्हणून शिक्षकवर्ग उपोषणाला बसला आहे. यापैकी एकाही प्रश्नावर सरकारकडे तोडगा नाही, पण महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे.

 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

युतीच्या अस्थिरतेची बीजं भाजपनेच २०१४मध्ये रोवली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शनिवारी पुण्यात एका सभेमध्ये राज्यातील ४८पैकी ४३ जागा भाजप जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या ‘निर्धाराचा’ही त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ एकीकडे ४३ जागा जिंकण्याचा निर्धार करायचा तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी युती करण्याच्या गोष्टी करायच्या. एकदा नक्की काय ते ठरवा’ अशी ताकीदच या अग्रलेखात देण्यात आली आहे.
तसंच राज्यातील समस्यांचा आढावा घेत भाजप सरकारच्या निष्क्रीयतेवर बोटं ठेवलं आहे. सत्ता सगळ्यांना हवी असते पण सत्तेच्या नशेत राहणं योग्य नाही अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत