भाजपला आणखी एक धक्का; माजी मंत्री जयसिंग गायकवाडांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

मागील आठवड्यात जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर यांनी पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुद्धा सुरू केला होता. जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत