भाजपला धक्का, गोव्यात कॉंग्रेस करणार सत्तास्थापनेचा दावा

पणजी : रायगड माझा

कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेची संधी दिल्यानंतर आता काँग्रेसने गोव्यात भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गोव्यातील राज्यपालांची भेट घेऊन कॉंग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

कर्नाटक विधानसभेत भाजप १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले ११२ जागांचे पाठबळ त्यांच्याकडे नाही. दुसरीकडे काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर (जेडीएस) या पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेस आणि जेडीएसने युती करुन सत्तास्थापनेचा दावा केला. पण कर्नाटकमध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिली. कर्नाटकमधील या घडामोडीनंतर आता काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसला १७ जागा आणि भाजपला १२ जागा असताना भाजपने मगोप आणि अन्य पक्षांशी युती करून सत्ता पटकावली होती. त्यामुळे कर्नाटकनुसार आता गोव्यातही सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपाची आता कोंडी होण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत