भाजपला मत देऊ नका; धनगर समाजाला आवाहन

Anna-Dange

अमरावती : रायगड माझा वृत्त

भाजपने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ, अशी घोषणा केली होती. चार वर्षे पूर्ण होऊन नव्याने निवडणूकही होणार आहे. परंतु, अद्याप भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे समाजबांधवांनी या निवडणुकीत भाजपला मतदान करू नये, असे आवाहन माजी मंत्री तथा धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी गुरुवारी (ता. ३१) अमरावतीत केले. एका कौटुंबिक कामानिमित्त शहरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंढरपूर ते माळशीरस असा मोर्चा काढणारे भाडोत्री आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी धनगर समाजातील इतर नेत्यांवर केली. धनगर समाज हा घटनेतच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट आहे. परंतु, तत्कालीन चतुर राजकारण्यांनी सोईस्करपणे धनगर समाजाला डावलले. जे घटनेत आहे, त्यावर समिती काय करणार, असे डांगे म्हणाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचे पुन्हा गाजर देऊन धनगर समाजाचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी भाजपची ही खेळी राहील, असे ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत