भाजपविरोधी आघाडीला आता ‘हत्ती’चे बळ ?

 

रायगड माझा वृत्त 

नवी दिल्ली- लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका वर्षभराच्या अंतरावर येऊन ठेपल्या असून विरोधी पक्षांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बहुजन समाज पक्षाची भाजपला शह देण्यासाठी साथ मिळणार असल्याचे वृत्त असून असे घडल्यास बसपची कर्नाटकानंतर पहिली निवडणूकपूर्व आघाडी ठरेल.

नुकतीच मायावती यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यावेळी खलबते करण्यात आली. मायावती यांच्यासोबत याच बैठकीत आघाडी करण्याविषयी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कर्नाटक निवडणुकीत बसपने जेडीएससोबत मोट बांधली होती. जेडीएसला निकालात त्याचा थेट फायदा दिसून आला असल्यामुळे आघाडीत मायावती सहभागी झाल्यास महाराष्ट्रातील दलित मतांवर प्रभाव पडू शकतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत