भाजपाचे चाळीस आमदार आमच्या संपर्कात; बच्चू कडू यांच्या दाव्याने खळबळ 

महाराष्ट्र News 24 वृत्त

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. तीन पक्षांचं सरकार अगदी व्यवस्थित चालू आहे. जनतेच्या भल्याचे निर्णय आम्ही घेत आहोत. त्यामुळे आमचं सरकार अस्थिर असण्याचा प्रश्नच नाही. याउलट विरोधी पक्षचं अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. असे म्हणत आमच्या संपर्कातील भाजपच्या 40 आमदारांची यादी तयार असल्याचा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. यांच्यात विसंवाद आहे, लवकरच हे सरकार कोसळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच बच्चू कडू यांनी भाजपचेच 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.तसेच, तीन पक्षाचं सरकार आहे अंतर्गत वादविवादाने आपोआपच पडेल असा विरोधक दावा करत असतात मात्र, आमचं महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष टिकणार म्हणजे टिकणारच, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

दररोज सरकारविषयी वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना आता राज्य  मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्य असलेल्या बच्चू कडू यांनी भाजपचे चाळीस आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. आता भाजप कडून याबाबत काय उत्तर दिले जाते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत