भाजपात माझ्याविरुद्ध कट रचला जातोय – अनिल गोटे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भाजपातूनच माझ्याविरोधात कट रचला जातोय. माझी अवहेलना होतेय, प्रचारभेत बोलू दिले जात नाही. पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दौऱयावेळी मला डावलले, अशी टीका भाजपचे धुळय़ाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. आपण येत्या 19 नोव्हेंबर रोजी आमदारकी आणि पक्षाचाही राजीनामा देणार आहोत, अशी घोषणा धुळय़ाचे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

गुंड सोनार याला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी टीकास्त्र्ा सोडले. या सोनार याने एका पोलीस निरीक्षकावर हल्ला केलेला आहे याकडे लक्ष वेधले जात आहे. पक्षासाठी मी कष्ट उपसूनही माझी अवहेलना होत आहे. पक्षात गुंडांना महत्त्व दिले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत