भाजपा आमदारावर मोलकरणीच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

लखनऊ : बदायू जिल्ह्यातील बिसौली येथील आमदार कुशाग्र सागर यांच्यावर मोलकरणीच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून लग्नाचे आमिष दाखवून कुशाग्र सागर यांनी बलात्कार केला. मी लग्नाचा विषय काढताच मला व माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पीडित तरुणीचे वडील बेरोजगार आहेत. तर तिची आई मोलकरीण म्हणून कुशाग्र सागर यांच्या घरी काम करायची. २०१२ मध्ये मी १६ वर्षांची होती. माझी आई मदतीसाठी मला त्यांच्या घरी न्यायची. याच सुमारास माझी कुशाग्र सागर यांच्याशी ओळख झाली. कुशाग्र सागरने मला लग्नाचे आमिष दाखवले आणि २०१२ ते २०१४ या कालावधीत त्याने माझ्यावर बलात्कार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तू १८ वर्षांची झाल्यावर लग्न करुया, असे मला कुशाग्र सागरने सांगितले. पण नंतर त्याने लग्नास नकार दिला. कुशाग्र सागर माझ्याशी लग्न करतील म्हणून मी हे इतके दिवस सहन केले. पण आमदार झाल्यापासून ते मला व माझ्या कुटुंबियांना धमकी देत आहेत, असे पीडित मुलीने सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत